अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासून दूर जाते
अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासून दूर जाते
उठल्याबरोबर सूत्रे खड्या आवाजात वाचावे,
तरी सुध्दा माझ्या आयुष्याचे गणित चुकावे,
रात्री डोळ्यातुन माझ्या गंगा वाहते,
अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासून दूर जाते.
अंकाने अंकानाच भागत बसावे,
पण दु:खाने आयुष्याला गुणावे,
वजाबाकीमध्ये माझे जीवन संपते,
अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासून दूर जाते
अर्बट मामूचे संशोधन वाचावे,
न्यूटनवरती आक्षेप मी घ्यावे,
पण माझ्या प्रकाशाला उंबराच अडवते,
अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासून दूर जाते.
प्रकाशाच्या तरंगाकडे आश्चर्याने पाहतो,
जगाला सापेक्षेतचा सिध्दांत मी समजावतो,
शेवटक्षणी वेळ येते व मला हरवते,
अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासून दूर जाते.
लहानपणी प्रत्यक्षात सर्व ग्रह पाहिले,
तेव्हापासून माझ्या स्वप्नांचे अवकाश लपले,
सूर्याचा तेज पाहून आकाश अंधारते,
अन् ही वाट माझ्या स्वप्नांपासून दूर जाते.
पहिल्यांदा वाटच स्वप्न दाखवते,
तेच स्वप्न नंतर ती वाट रंगवते,
त्याच स्वप्नांची वाट वाट लावते,
अन् हीच वाट माझ्या स्वप्नांपासून दूर जाते.