माझे बाबा
माझे बाबा
असा का रे बाबा तू....
कितीही त्रास तुला जरी झाला
दिसू न दिला आपल्या परिवाराला
तुझा हाच आदर्श घेवून मला
पण तुझ्या सारखं व्हायच आहे रे बाबा
मला पण तुझी कार्बन कॉपी व्हायच रे बाबा
मला तुझा तो शब्द आज ही आठवतो तू सर्वांना सांगायचं की माझी मुलगी आहे माझा अभिमान
खरच खूप great आहेस रे बाबा माझा..||ध्रु||
असा का रे बाबा तू....
जेव्हा केव्हा आयुष्यात अपयश येत
सगळं संपल अस मला वाटत
तेव्हा बाबा मी तुलाच का रे डोळ्या सोमर ठेवत
जग म्हणते की आई ही लेकराची सावली असते
पण मी बघितले त्या सावलीला
जपणारा हा देवमाणूस बापच असतो,
खरच खूप great आहेस रे बाबा माझा...||१||
असा का रे बाबा तू.....
मी बघितलं बाबा तुला जुनी चप्पल
दुरुस्त करून घालताना
माझ्या साठी नवीन चप्पला घेताना
माणूस म्हणून तू कितीही गरीब असला तरी
बाप म्हणून माझ्या साठी जगातला
सर्वात श्रीमंत माणूस तूच आहेस रे बाबा
खरच खूप great आहेस रे बाबा माझा..||२||...
असा का रे बाबा तू.....
चालताना जरी मला ठेच लागली असता
आई ग.. हेच वाक्य येती तोंडी
पण कुठला मोठा बिकट दृष्य डोळ्या सोमर
येताच आधी तूच येतो बापरे म्हणून तोंडी
मी बघितलं मुलीवर सर्वात जास्त कोणी
प्रेम करत असेल तर तो तूच असतो रे बाबा
माझ्या all प्रॉब्लेम्स च solutions तूच रे बाबा
खरच खूप great आहेस रे बाबा माझा..||३|
असा का रे बाबा तू.....
तुला पण रडला येत पण तू
कधी कोणाला दाखवत नाहीस
पण जेव्हा तुझी छकुली सासरी जाते
तेव्हा मी बघितलं बाबा तुला सर्वान समोर रडताना
जो स्वतः टपरा मोबाईल वापरून
मुलांना स्मार्ट मोबाईल घेवून देतो
तोच तर देवमाणूस माझा बाप असतो
खरच खूप great आहेस रे बाबा माझा..||४||
असा का रे बाबा तू.....
बाबा तुझ्या चेहऱ्यावरील गोड हसू
माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी शक्ती जणु
मुलीवर आकशा येवढं जो प्रेम करतो
तो दुसरा कोणी नसुन बाबाच असतो
माझ्या बाबाला शब्दात मांडायला माझा बाबा
एवढा छोटा नाही आणि
बाबाला शब्दात मांडला मी एवढी मोठी नाही
खरच खूप great आहेस रे बाबा माझा..||५||.
