STORYMIRROR

Gaurav Daware

Tragedy Fantasy

3  

Gaurav Daware

Tragedy Fantasy

चिराग चमत्कारी...

चिराग चमत्कारी...

2 mins
177

आज मला पडलं एक स्वप्नच भारी

वाटतंय सांगावं कोणाला थोडतरी

पण स्वप्न ऐकायला नाही कोणी घरी

म्हणून लिहितोय कविता आता थोडी बरी


स्वप्नात घडला एक चमत्कार भारी

सापडला अलादिनचा चिराग माझ्या घरी

मी त्याला हात लावताच निघाला जीन अवतारी

म्हणाला मला मांग दोन इच्छा चमत्कारी


मी झालो खूष अन बनलो थोडा सावकारी

म्हटलं मले पाहिजे एक गर्लफ्रेंड भारी

गोरी गोरी पाहिजे जणू आहे अनुस्वारी

बाहुली वाणी पाहिजे जणू परी अविष्कारी


तेव्हाच जीनणे आणली माझ्यसमोर एक मुलगी भारी

डोळे तिचे निळे जणू सापडलय पाणी चंद्रावरी

दिसायला एवढी सुंदर जणू अप्सरा साक्षात्कारी

गाल एवढे गोड जणू रसगुल्ला बनतोय लाचारी


केस एवढे काळे जणू शाम्पू वाहताय पृथ्वीवरी

नाक होत छोटंसं जणू परमेश्वर करतोय चित्रकारी

एकटक माझ्याकडे बघत होती जणू मी कोणी अलंकारी

डोळ्यात माझ्या लपत होती जणू तिच प्रेम माझ्यावरी


तेवढ्यात झाला ठकठक चा आवाज दरवाज्यावरी

मी म्हटलं कोण आहे बाहेर सांगा थोडंतरी

असं म्हणताच आई बाबांचा आवाज आला भारी

म्हणे दार उघड लवकर येऊ दे आम्हालाही घरी 


आईबाबा दरवाज्यावर येताच झाली पंचायत सारी

काय करू कुठे जाऊ डोकं झालंय तंटाकरी 

आईबाबाला दिसली ही पोरगी तर ते लाथा देईल कंबरेवरी

कुठे लपवावं इला काहीच सुचत नव्हतं थोडं तरी


तेव्हड्यात जीन म्हणाला मांग दुसरी इच्छा लवकरी 

मंग मी निघतो इथून तुम्ही राहा दोघेही घरी

खुप प्रेम करा एकमेकांवर जणू तुम्ही आहात साक्षत्कारी

हळुवार जपा एकमेकांना बनवा आयुष्य कलाकारी


मी म्हणलो अहो जीन नको ज्ञान देऊ थोडंतरी

माझ्या आईबाबांनी पाहाल तर तुमच्याही देईल लाथा कंबरेवरी

म्हणून तुम्ही आता एकच करा घेऊन जा ईला स्वतःच्या घरी

हिच माझी इच्छा समजून बनतोय मी लाचारी


असं म्हणताच जीन आणि ती झाली गायब सारी

गायब होताच स्वप्न तुटलं अन झालो मी कैवारी

स्वप्न तुटूनही तिची शेवटची नजर होती कमाल भारी

न बोलताही तिच्याशी प्रेमाची ओळख झाली चिक्कारी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy