STORYMIRROR

Malati Semale

Fantasy

3  

Malati Semale

Fantasy

पाऊस

पाऊस

1 min
13.6K


 

नभातल्या त्या काळ्या मेघातून

निघतो तुझा झरा

पावसा रे पावसा,

तू येना जरा जरा.

रातंदिवस कोसळत राहतोस

भूमातेला आपल्या कवेत घेतोस

थोडा तू विसावा घेना जरा

पावसा रे पावसा,

तू येना जरा जरा.

अवतीभवती साचून बसतोस

कुरणावरती खेळत राहतोस

थोडा त्यांना श्वास घेऊ देना जरा

पावसा रेपावसा,

तू येना जरा जरा.

नदी नाल्यांमध्ये पूर लोटतो

लहरी लाटांसवे उसळलत जातो

थोडा त्यांना संथ वाहू देना जरा

पावसा रे पावसा,

तू येना जरा जरा.

शेतामधूनी पिके बहरती

अतिशय पाणी घातक बनती

थोडा त्यांचा विचार करना जरा

पावसा रे पावसा,

तू येना जरा जरा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy