ती रोज वेदनेला
ती रोज वेदनेला
1 min
616
ती रोज वेदनेला सोशीत खूप होती
डोळ्यात आसवांना ढाळीत खूप होती.
शाळेत जात होती नव्हते मनात काही
वाटेत जाळ होता विव्हळीत खूप होती
कळले तिला न तेंव्हा विपरीत काय झाले
झोपेतही स्वतःला हिनवीत खूप होती
ती आग लावताना तो क्रूर का बनावा
जालीम त्या विषाला साहीत खूप होती.
मृत्यूस ती विचारी अपराध काय माझा
आहे समाज कोठे विनवीत खूप होती