चिमणी आई
चिमणी आई


इवल्या इवल्या चोचीने
घरटे बांधले इटूकले,
अंड्यातून बाहेर आली
पिल्लू तिचे पिटूकले.
चिवचिवाट तो पिलांचा
आहाट ती भूकेची,
दाणे पडण्या चोचीमध्ये
हाक आईला पिलांची.
ठेवून घरट्यात चिमुकल्यांना
भरारी घेते चोहीकडे,
एकेक दाणे टिपताना
जिव तिचा घरट्याकडे.
ऊन, वारा, पावसापासून
रक्षणार्थ उभी पिल्यांच्या,
पंखात बळ येईपर्यंत
नजरेत चिमणी आईच्या.