हा निसर्ग
हा निसर्ग
1 min
495
हा निसर्ग माझा देव, ही धरणी माझी माय
ह्या हिरव्या पांदण वाटा ओढती माझे पाय
बेधुंद वाहतो वारा हा, तन मन पुलकित सारे
मला खुणवती रानाची ही सताड उघडी दारे
आनंदाला उधाण येता हवे आणखी काय
खळखळणारा पाट वाहतो घेऊन निर्मळ पाणी
अंकुरलेले जीव सानुले गणगुणती अमृत गाणी
त्या बांधावर चरते आहे माझी पांढरी गाय
वाऱ्याच्या संगतीने डुलते, हिरवे हिरवे रान
किलबिलणारी पाखरे बसली फांदीवरती छान
दूर कोकिळ पानाआडून लयीत गातो ठाय
देखावा सुंदर बघुनी होई प्रसन्न भाव मनाचे
साठवते ह्रदयात माझ्या, अनमोल धन स्रुष्टीचे
अशा ठिकाणी चाखण्या मिळते, नित्य सुखाची साय
