अभिव्यक्ती स्त्री मनाची
अभिव्यक्ती स्त्री मनाची


जगताची या जननी
मातृशक्ती सृजनाची
बंधनात का तरीही
अभिव्यक्ती स्त्री मनाची
वेध घेण्यास आतूर
नवनव्या कल्पनांचा
मिळो स्वातंत्र्य नारीला
मान व्हावा भावनांचा
शांत,संयमी,सबला
तेजपुंज सौदामिनी
बुद्धीमती मीतभाषी
यशोमती,स्वाभिमानी
जुन्या तोडून श्रुंखलां
श्वास घेऊद्या मोकळा
यश शिखरी जाऊद्या
मार्ग जोखू द्या वेगळा
सिद्ध करण्या अस्तित्व
हात द्याहो आधाराचा
फडकेल उंच नभी
ध्वज तीच्या कर्तृत्वाचा