STORYMIRROR

shubham gawade Jadhav

Fantasy

3  

shubham gawade Jadhav

Fantasy

बदलला माणूस आता

बदलला माणूस आता

2 mins
240

काय असायची जुनी माणसं राव ?? 

जिथे वसायचा प्रेम जिव्हाळ्याचा गाव 


भेटल्यावरती रामराम असायचा 

त्यांच्या त्या शब्दात आदर दिसायचा 


दारात आलेल्याला कधीच दुजीभावना नसायची 

तामभर पाणी हातावर गूळ द्यायची पद्धत असायची


तिथं मानलं जायचं स्त्री ला जीवनाचा शिल्पकार 

होत नव्हता तिच्यावर कधीच कसला अत्याचार  


पोटात तेहतीस कोटी देव असलेली पुजली जायची गाय 

संस्कार करून नातवंडांवर शोभा वाढवायचे घराची बाप नी माय 


तिथं होती पद्धत परक्या स्त्रीला मातेसमान मानायची 

कोण करणार हिम्मत चार महिन्याच्या पोरीवर बलात्कार करायची 


पूर्वी माणूस मेहनती आणि आदर्शवादी असायचा 

मिळेल ते खाऊन त्यात स्वतःचं समाधान मानायचा 


तिथं दया, क्षमा, शांती आणि सुख यांची वस्ती असायची 

मोबाईल नव्हते ना टीव्ही सगळी माणसं गप्पा मारत बसायची


तिथं व्हायची संस्कार आणि विचारांची देवाण घेवाण 

कोणच कोणाला समजत नव्हत श्रीमंत आणि लहान 


दिवसांमाघून दिवस गेले बदलला माणूस आता 

हैवान,अन्यायी झालाय तो त्याच्याकडून कसला आदर्श घेता?


स्वतःच्या स्वार्थासाठी तो आपसुकांचीच पाढु लागलाय म्हडी 

माणूस म्हणून जगताना विसरलाय तो माणूसपणाची गोडी 


माणूस आता स्वार्थ, लोभ, पैसा यांच्या पाठीमाघ पडलाय 

भावनाविरहित दगडासारखा तो सगळ्यांशी वागू लागलाय 


विध्वंसक प्रवृत्तीला वाव देऊन मोठं व्हायची करतोय घाई 

विसरतोय तो याच प्रवृत्तीमुळे जवळ करतोय मृत्यूची खाई 


त्याच्या या असुरी अन्यायी वृत्तीची वाढतच चाललीये कहाणी 

पाहून हे भयानक दृश्य आटलं पृथ्वीमायच्या डोळ्यातलं पाणी


 माणूस माणसात ऱ्हायलायच कुठं? त्याला समजना काही 

अन्यायाची कास वाढत चालली गल्लीगल्लीत झालेत भाई 


काही दिवसांपूर्वी प्रियाताई सोबत एक घटना घडली 

या हृदयद्रावक घटनेने धरतीमयसुद्धा धायमुकलून रडली


भयानक,विध्वंसक अशी कृत्य माणसाची झालीत फार 

तेहतीस कोटी देवांनीही मानली या क्रूर माणसापुढे हार 


विसरला तो या सुंदर आयुष्याचं गुपित इथच दडलय 

आपलं आयुष्य माणूस म्हणून जगण्यासाठी घडलय 


पहिल्यासारखं काहीच नाही राहिल सांगतो सर्वांनाच जाता जाता 

खरंच बदलला माणूस आता... बदलला माणूस आता


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy