STORYMIRROR

Shobha Wagle

Fantasy Others

4  

Shobha Wagle

Fantasy Others

एक वाईट स्वप्न

एक वाईट स्वप्न

1 min
432


मध्यरात्री जोराने किंचाळून मी उठले

आवाजाने सगळेच जागे झाले...

शरीर घामाने चिपचिपले होते

त्याला कारण ही तसेच होते

मी एक वाईट स्वप्न पाहिले होते...


साऱ्या सोसायटीचे लोक गेलो होतो आम्ही

सहलिला महाबळेश्वरला.

मुले बाळे लहान थोर मजा मस्ती मस्त 

धमाल केली

परतीच्या प्रवासात बसचा झाला टायर पंचर

घोर अरण्यात झाडा झुडपा शिवाय नाही कुणी!

वेळ आहे म्हटल्यावर सगळेच विखुरले जंगलाच्या वाटेवर.

मी ही होते सर्वां बरोबर मोकळ्या जंगल वाटेवर.

झुळझुळ झऱ्याचा आवाज पडला कानी

मैत्रिणीला बोलवून चालले घेत कानोसा झऱ्याचा

मी गेले पुढे मैत्रिण राहिली मागे.

निर्मळ स्वच्छ पाणी मोह न आवरे मज

गेले पाय भिजवायला तेथे....


निसटला पाय, पडले मी पाण्यात, पण कुणीच नव्हते तेथे मज सावरायला. 

कसेबसे सावरले, पाण्यातुन आले बाहेर तर

समोर पाहिला वाघ. शब्द फुटेना

समजून चुकले आता काही खरे नाही.

वाघाच्या रुपात काळ होता समोर. पण त्याचे लक्ष नव्हते माझ्याकडे.


दबत्या पावलाने तेथून निसटण्याचा केला 

प्रयत्न. थोडे पुढे गेले मात्र, वाघाने फोडली डरकाळी आणि धावू लागला माझ्या मागून

आवाजाने सारे जंगल दणाणले. तो पर्यंत मी पोचले बसच्या जवळ.

वाघाला पाहून जे होते तेथे, ते लागले धावायला सैरावैरा. ड्राईव्हरच्या हाती होता पाना आणि टायर, तो फेकला त्याने वाघावर पाना बरोबर गेला वाघाच्या घशात तरी चवताळून तो येत होता चालून. सगळे लागले पळापळीला जीव मुठीत घेऊन स्वतःचा. मीही धावतच होते.

समोर होता उंच कडा 

धावण्याच्या नादात नाही आले लक्षात आणि मी त्या उंच कड्यावरून खोल खोल खाईत पडले तुकडे तुकडे होऊन.

आईने दिले पाणी तेव्हा मानले देवाचे आभार कारण मी होते माझ्याच घरी आणि पाहिले होते मी वाईट स्वप्न.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy