STORYMIRROR

Anil Chandak

Fantasy

4  

Anil Chandak

Fantasy

पऱ्यांच्या देशात

पऱ्यांच्या देशात

1 min
298


देवा माझ्या,सपनात येशील कां !

पऱ्यांच्या देशात ,चलशील कां !!1


सुंदर सुंदर,पऱ्या पंख लावलेली!

शुभ्र नवे, झगे अंगी घातलेली !!2


दुडदुड लगबग, चालत होती !

गप्पाटप्पा मारित , हासत होती !!3


पऱ्यांच्या गांवात,शाळा ही होती !

स्वच्छ सुंदर,निटनेटकी होती !!4


 कुठे गडबड नाही, गोंधळ नाही!

अभ्यासाची, सक्ती मुळीच नाही!!5


मोठ्या बाईपरि ,परी शाळेवर होती!

हंसत खेळत बोलूनी,शिकवत होती!!6


मधल्या सुट्टीत,छोट्या पऱ्यांनी मस्ती खुप केली!

 आनंदाने खायाला होती,शिकरण पोळी!!7


मुले मुली बसली,रांगेत होती!

गोड आवाजात,मंजुळ गाणी म्हणत होती!!8


मन लावून मी,सारी गाणी ऐकली !

सपनात एकदम, मला झोप लागली !!9


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy