तुला पाहिल्यावर
तुला पाहिल्यावर


तुला पाहिल्यावर मन झेप ऐशी घेती
आकाशी हात लावून पुन्हा परतूनी येते
तुला पाहिल्यावर मनाचा फुलतो फुलोरा
तुला पाहिल्यावर मिळे जगण्यास दुजोरा
तुला पाहिल्यावर तेव्हा मी न माझा राहतो
सागराच्या लहरींसवे एक लाट बनुनी वाहतो
तुला पाहिल्यावर नवे गीत ओठी येते
पक्षीयांचे थवे होऊनी गगनात फिरते