STORYMIRROR

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Tragedy

3  

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Tragedy

होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा

1 min
323

होता असाच एक वेडा मुलगा

माझ्यावरती खुप प्रेम करायचा

सा-या जगास विसरून तो

फक्त माझ्यावरतीच मरायचा


मी दिसताक्षणी त्याला मनातून

तो फुलासारखा फुलून जायचा

मला नेहमी हसत ठेवण्यासाठी

काय सांगू तो काय काय करायचा


आणि मी ...मी काय केले.......


त्याच्या मनाच्या भावनांशी खेळले

त्याच्या ख-या प्रेमाला खोटे ठरवून

त्याला एकट्याला अर्ध्यावर सोडून गेले

आणि त्याला विरहाच्या दरीत ढकलून दिले


मी फक्त माझ्याच विश्वात रमली होती

मी फक्त माझाच स्वार्थ पाहत होती

आणि त्याने....त्याने तर माझ्या विरहाने

कित्येक अश्रू ढाळून एकेक रात्र काढली होती


जेव्हा कधी तो एकटा असायचा

माझाच विचार करत बसायचा

कितीही असेल जरी मनात दुःख

तरी माझ्यासाठी तो नेहमीच हसायचा


मी तर नेहमीच तेव्हा माझ्या फक्त

भविष्याची काळजी करत होती

आणि त्याला मी सोडून गेली जेव्हा खरच

त्याला एका प्रेमळ हाताची गरज होती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy