बघ तूझा विचार बदलला तर
बघ तूझा विचार बदलला तर
किती दिवसांचे प्रेम होते रे आपले ?
बस्स काही दिवसांचे ?
पण याला तसे प्रेम
म्हणताही येनार नाही
मैत्रीच समज हवे तर
पण तेच तुझ्यासोबतचे
काही दिवस आज माझे
आयुष्य बनून राहिले रे
त्या काही दिवसात मी
इतकी तुझ्यात रमून गेले होते
की मी माझी मलाच
विसरून गेले होते रे
कळलेच न्हवते मला
मी कधी तुझी झाले होते ते
तुझ्यासोबतच ते हसणं , बोलण,
अगदी मनमोकळं बागडन
किती किती छान वाटत होत रे
पण तु असा काही अचानक
माझ्या आयुष्यातून निघून गेलास
कि जस माझ सार आयुष्यच
कोणीतरी हिरावून घेतले
असचं वाटले रे मला.
आता तु माझ्या आयुष्यात
असलास काय नि नसलास काय ?
काय फरक पडतो
कारण आता मला दुसऱ्या कोणावर
प्रेम होण आता ते शक्य नाही.
माझ्या आयुष्यात तु
असा काही आला होतास
की माझे सारे आयुष्यच
खुलून गेल होत रे .
आता कुठे थोडी
रमले होते रे मी तुझ्यात
अन् तु असा अचानक
तुझा निर्णय सांगून निघून गेलास
माझ्या आयुष्यातून
कितपत पटले रे तुला हे
अस तुझ वागणं ?
सांग ना एकदा मला
बघ जमतय का एकदा
माझा विचार करायला
बघ एकदा आलास तर
ये परत कारण मी
आजही तुझीच आहे रे .
जबरदस्ती नाही पण बघ
जरा तुझ्या मनाला विचारून
कुठे चुकलय का तुझ
माझही मन तुला
कळतय का बघ
माझ कुठे चुकलेय
तेही सांग मला .
काय वाटतय तुला माझ्याविषयी
तेही एकदा सांग मला ...
बघ तुझा विचार बदलला तर
बघ तुझा विचार बदलला तर

