STORYMIRROR

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

3  

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

तू गेल्यावर

तू गेल्यावर

1 min
239

तु गेल्यावर...

जग हे माझे ऊदास झाले

तु गेल्यावर ....

नयनी का या अश्रू आले..?

तु गेल्यावर ...

श्वास मनाचा बंद वाटतो

तु गेल्यावर...

मृत्यू ही मग जवळी भासतो


तु गेल्यावर...

श्रावण धारा मंद जाहल्या

तु गेल्यावर....

चांदण्याही रुसून बसल्या

तु गेल्यावर ....

आकाशाचा चंद्र ही रुसला

तु गेल्यावर....

जीवनात या रंगही कसला


तु गेल्यावर...

घर हे माझे..माझे न आता

तु गेल्यावर...

गीत कोणाचे गाऊ मी आता

तुझ्याविना मग...

मी ही सजणी कसे जगावे 

तु गेल्यावर....

सुंदर जीवन मी कसे बघावे

तु गेल्यावर...

तु गेल्यावर...

तु गेल्यावर.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance