STORYMIRROR

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

4  

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

भावनांचे मोल

भावनांचे मोल

1 min
289

मनाची व्यथा माझी आज

तिच्यापर्यंत पोहचवली

मग भावनेची भावनेला

भावना होती कळलेली


तीही भावूक मीही भावूक

दोघेही अश्रूत भिजलेली

थोडासा वेळ ती माझ्या 

होती मिठीत सामावलेली


तीही थोडीशी हसलेली 

अन् माझ्यावरती रूसलेली

पुन्हा परतून माघारी ती

प्रिती तिच्यावर भाळलेली


मीही होतो नासमज अन्

तीही थोडी बावरलेली

इतक्या मोठ्या धोक्यातून

तीही थोडी सावरलेली


आता भावनांचे मोल समजेल

तिलाही अन् कदाचित् मलाही

वेळेवरती जर घडली असती भेट

तर झुकावे लागले असते प्रेमालाही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance