माणसा तू हारू नको
माणसा तू हारू नको


*येतील सारी खुप संकटे*
*पण घाबरून तू जाऊ नको रे*
*कर तू सा-या संकटांवर मात*
*पण माणसा तू हारू नको रे*
*देवाजीने दिधले तुजला रे*
*अनमोल हे आयुष्य सारे*
*त्या जीवनाचा कर योग्य वापर*
*पण जीवनात वाया जाऊ नको रे*
*कर तू सा-या संकटांनवर मात*
*पण माणसा तू हारू नको रे*
*आयुष्य हे नेहमी असेच असते*
*कधी सुख तर कधी दुःखही असते*
*आले जरी दुःख जीवनात तरीही*
*त्यावर हसत मात करायची असते*
*पण छोट्या मोठ्या दुःख यातनांनी*
*मनाचे खच्चीकरण तू करू नको रे*
*आयुष्याला देऊन खडतर ऊत्तर*
*जीवनाच्या वाटेवर तू चालत रहा रे*
*कर तू सा-या संकटांवर मात*
*पण माणसा तू हारू नको रे