Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

3  

प्रेमकवी सागर [ Love poet SAGAR ]

Romance

माझ्या वेडीसाठी

माझ्या वेडीसाठी

1 min
489


आपण कितीही भांडलो,

रागावलो जरी एकमेकांवर

तरीही विश्वास असतो आपला

आपण जपलेल्या नात्यावर


मी रागावल्यावर तुझे फुगून बसणे,

आणि मी हळूच पाहिल्यावर तुझे

गालातल्या गालात हसणे आणि मग

" गप्प बसा तुम्ही , बोलू नका माझ्याशी"

असे तुझे बोलणे यातच आपले प्रेम सामावलेले असते.


आपल्याला दोघांना आता असच

रुसत, फुगत एकमेकांसोबत आयुष्यभर

आपल हे नवरा बायकोच नात जपायचय

अन् आपण मांडलेल्या या संसारासाठी

आता एकमेकांसोबत खपायचय


मी कधी तुझ्यावर रागावलोच

तर थोड मला तू समजून घे

तुलाही कधी काही हव असल्यास

अगदी बिनधास्तपणे तू मागून घे


पण वेड्यासारख वागून कधी

एकट्याला मला सोडून तू जाऊ नकोस

अन् चुकलच माझ कधी काही तर

बिनधास्त ओरडायला माझ्यावर

मागेपुढे तू कधी पाहू नकोस


अग वेडे तुझ्याशिवाय सांग ना

या आपल्या संसाराला रंगत ती कसली..?

तू नसशील सोबत तेव्हा समजून जा

कि नक्कीच या संसाराला घडी बसली...


अग तुझ्याशिवाय वेडे माझे असे जगणे ते काय...

अन् तुझ्याशिवाय या फाटक्या संसारात

मग हाय काय नी नाय काय

म्हणून तुला वेडे मी आता एक सांगतोय


सप्तपदीसोबत चालताना घेतलेल्या

वचनांना आपण कधीही विसरायचे नाही

देऊया साथ एकमेकांना आयुष्यभराची

तेच आपल जग आणि तेच सार काही...

तेच आपल जग आणि तेच सार काही...Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance