STORYMIRROR

Supriya Devkar

Romance Others

3  

Supriya Devkar

Romance Others

रंग गुलाबी

रंग गुलाबी

1 min
334

गुलाबी गाली खळी खुलली

तुझ्या प्रीतीची गोडी कळली


सालस प्रेमाचे कारंजे उडाले 

तुझ्या प्रेमात मी पुरती बुडाले


अवखळ नजरेने मला पाहणे

तुझ्या नजरेतून मी वाहणे


लडिवाळ स्पर्शाने हरवून जाणे

तुझ्यात तल्लीन होऊन गाणे


गुलाबी कळी मी तुझी प्रिया 

तुझ्या प्रेमाने थरथरली काया


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance