कार आणि सायकल
कार आणि सायकल
कार मधुन उतरली ती
आणि मी जमिनीवर आलो
काही दिवसांपूर्वीच ओळख झाली
अजुन एकमेकांपुरते नव्हतो ओळखतही
पण ओढ एकमेकांची लागली नक्की होती
इतकी श्रीमंत असेल मला नव्हते माहित
सायकल वरुन उतरलो
तिला दिसणार नाही अशी सायकल स्टँड ला लावली
तेवढ्यात पाठीवर थाप बसली !!
मागे वळून पहिले तर तिच उभी !
काय अरे मला पाहुन असा भांबावलास का?
ती दिलखुलास हसत म्हणाली
काही नाही असेच - मी ओशाळुन म्हणालो
अरे वेड्या मी तुला तुझ्या सायकल सहित पसंत करते
घेशिल मला डबल सीट, नेशिल लॉंग ड्राईव्ह?
दोघांचे डोळे डबडबले होते
सायकल आता कारच्या टपावर असते
दोन जीव एकजीव असतात कार मधे
सोनुकले मागच्या सिटवर
शांत झोपी गेलेले असते.......

