STORYMIRROR

Vijay Patil

Inspirational

3  

Vijay Patil

Inspirational

मैत्री

मैत्री

1 min
188

जीवनात कात्री मधे

अडकले असता

खात्री ने सोडवणे

म्हणजे मैत्री.....


बिनधास्त चड्डी ओढणारा

अडचणित असताना

स्वतःची फेडुन देणारा

असतो तो मित्र


जिथे ना मागणी

ना असते परतफेड

असते ते फक्त

निर्व्याज प्रेम ......


पैसे तर सगळेच कमावतात

मित्र किती आहेत खजान्यात

त्यावरुन समजते तुमचि

खरी पत आणि औकात !!


दिवस ना रात्र

वेळ ना काळ

धावुन येतो क्षणात

मित्रच तो हमखास


सांगुन तर करेल ही मदत कोणी

मित्र असा प्राणी

न सांगता समजते त्याला सर्व काही

सर्वस्व अर्पण करतो मित्रावरी


अशा माझ्या मित्रांना 

अशा मैत्रिला

माझे त्रिवार वंदन

भरू दे अशा मित्रांनी अंगण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational