STORYMIRROR

Vijay Patil

Tragedy

3  

Vijay Patil

Tragedy

पोलिस

पोलिस

1 min
164

पोलिस पोलिस खेळता खेळता,

प्रत्यक्षात पोलिस कधी झालो,

हे कळलेच नाही -

आणि आता कळले,

तो खेळ नाहीच मुळी,


हृदय पाषाण,

हातावर अंगार,

झोपेचे खोबरे,

कुटुंब वाऱ्यावर ठेवावे लागते


प्रामाणिक असेन तर मुर्ख,

पैसे खाल्ले तर लाच खावू,

करायचे तर काय करू ?

आणि येवढे करून मिळते काय?


लोकांकडून प्रतारणा,

बऱ्याच वेळा अवहेलना,

सरकारकडून तुटपुंजा पगार,

दहा बाय दहा च्या दोन खोल्या,


चाळ अशी की,

कैद्यांचे तुरुंग बरे.....

आमच्या पेक्षा कैदी असतो सुखी,

तरी सोसतो आम्ही सर्व काही. 

माहित असते हे सर्व आधी,

कशाला खेळलो असतो,

पोलिस पोलिस कधी?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy