अचानक
अचानक
प्रेमाचा अंकुर रुजला
कधी केंव्हा कुठे कसा
असले प्रश्नं विचारु नका
पाणी ख़त जमिन हवा
नसले तरी चालते प्रेमा
हृदयाल हृदय भिडता
अंकुर आपसुक रुजला
नाही समजत दोन जिवां
प्रेम वृक्ष कधी फोफावला
ना कळे तिला ना त्याला
प्रेम अशी अनुभती असते
परमेश्वरालाही ना कळले
न कळत सर्व काही घडते
ना कळे तिला ना त्याला

