STORYMIRROR

Vijay Patil

Comedy

2  

Vijay Patil

Comedy

फिक्या सर्व चवी

फिक्या सर्व चवी

1 min
46

गोल गोल गुलाब जामून,

जाम आवडतात मला, 

म्हणून गुटू गुटू खातो त्यांना!!


कुरकरीत खेकडा भजी,

आणतात तोंडाला पाणी,

गट्टम् करतो डझनावारी!!


पिवळी रसाळ जिलेबी,

करम करम गरम गरम खातो,

जास्त नाही अर्धा एक किलो.


चकली तर मला अती प्रिय,

जगात एकमेव काटे, चकलीचे काटे,

जे प्रेमाने कुरुम कुरूम जातात खाल्ले


ती खुसखुशीत बालुशाही,

विचारूच नका काहीही,

दाता खाली हळूच चिरडून जाई !!


गरम गरम तिखट चिवडा,

कांदा आणि लिंबू टाकून,

संपवतो मिंटात बचक, बचक भरून !!


आणि पांढरी शुभ्र काजूकतली,

कत्थक करत करत जाते तोंडात,

आणि किती साऱ्या घुसतात पोटात !!


मोतीचुर, बेसन, रवा लाडू,

करतात माझे डायटिंग मोडू,

एक एक करता जातात पोटात समावू.


तीखटा मिठाच्या पुऱ्या आणि,

लसणाची चटणी,

तोंडातले पाणी अजूनही पाडी.


आता मला सांगा तुम्हीच,

वजन कसे राहावे मर्यादित?

आणि हो,

खरे सांगू?

फिक्या वरील सर्व चवी,

जेंव्हा तिचे ओठ,

माझ्या ओठावर विसावी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy