छत्री
छत्री
चिंब ओले अंग
मनही चिंबाचिंब !!
अशिच भेटली होती
चिंब संध्या समई....
काय गोड दिसत होती
वारा पाणी असमर्थ पणे
थोपवत होती !!
साडी होती
पूर्ण भिजलेली
तोकडी काया लपवण्या तिची
दैना माझ्या जिवाची
हातात होती माझ्या छत्री!!
तिची असाह्य नजर प्रश्नार्थी
मी ही बापडा होकारार्थी
मग काय?
छत्री मधे होती ती ही !!
चटका बसेल अशी काया तिची
त्या थंड वातावरणात ही
मग काय?
आहो आज आहे ती
माझ्या दोन मुलांची आई !!
आजुन आहे जपुन ठेवली
कपटात ती अनमोल छत्री !!

