STORYMIRROR

Vijay Patil

Romance

2  

Vijay Patil

Romance

नाजूक सखी

नाजूक सखी

1 min
60

हातावर फक्त मेंदी काढली तिने,

पण मनगट तिचे लचकले,

दूसऱ्या दिवशी मेंदीच्या रंगाने.....


गाल तिचे लाल झाले,

मी तर चुबंन घेतले तिच्या फोटोचे,

ते ही माझ्या स्वप्ना मधे.....


अंधारी खोलित चक्क प्रकाश पडला,

तिने तिचा पाय गोरा,

फक्त उंबऱ्यातून आत टाकला.....


चुळ भरुन तिने पाणी शेतात टाकले,

दुसऱ्या दिवशी मी पहिले,

चक्क तिथे गुलाब फुललेले.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance