STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Romance

3  

Sagar Jitendra Bangar

Romance

तुझं असणं अन तुझं नसणं

तुझं असणं अन तुझं नसणं

1 min
209

तुझं असणं आणि तुझं नसणं त्यावरचं माझं अस्तित्व असणं

तुझं असणं म्हणजे आयुष्य कस बहरल्यासारखं,

तुझं नसणं म्हणजे घरटचं जणू विखुरल्यासारखं...


तुझं असणं म्हणजे नित्य नियमाची सुंदर पहाट,

तुझं नसणं म्हणजे न सरणारी काळोख रात्र...


तुझं असणं म्हणजे नियतीचा हा हळुवार स्पर्श,

तुझं नसणं म्हणजे दिसागणिक असे हा संघर्ष....


तुझं असणं म्हणजे जीवन कस आनंददायी,

तुझं नसणं म्हणजे निराशाच असे फक्त ठायी...


तुझं असणं म्हणजे जीवात जीव एकच जीव,

तुझं नसणं म्हणजे असे सर्वच काही निर्जीव....


तुझं असणं म्हणजे रम्य रम्य त्या आठवणी,

तुझं नसणं म्हणजे डोळ्यात अश्रू येतात दाटुनी...


तुझं असणं म्हणजे बंद डोळ्यांनी संपूर्ण जग पाहणं,

तुझं नसणं म्हणजे डोळ्यासमोर असतानाही काहीच न उमगणं...


तुझं असणं म्हणजे सर्वस्व मिळाल्याची जाणीव,

तुझं नसणं म्हणजे जीवनात साऱ्यांचीच उणीव....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance