STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Romance Action Inspirational

3  

Sagar Jitendra Bangar

Romance Action Inspirational

शब्दाचा आधार

शब्दाचा आधार

1 min
158


नकोच पैसा नकोच धन

मी शब्दांचा आधार मागतो।

संकटाशी लढेन धैर्याने

तुझा फक्त आभास मागतो।।


आयुष्याच्या या वळणावर

अजून मी अस्वस्थ असतो।

जगण्याची नसे इच्छा तेव्हा

तुझाच सहवास मागतो।।


दुःख येताच दारात माझ्या

थोडा त्यातून मी सावरतो।

हळव्या त्या क्षणात माझ्या मी

तुझा गं हात हाती मागतो।।


स्वप्नांच्या त्या रात्रीस जागून

डोईवरचे ओझे वाहतो।

झुळूक वाऱ्याच्या सोबतीस

स्पर्श हळुवार मी मागतो।।


हाल माझे मी गोड मानून

सारेकाही सहन करतो।

त्या सहनशक्तीला केवळ

तुजसंगे जगणे मागतो।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance