Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sagar Jitendra Bangar

Romance Inspirational Others

3.9  

Sagar Jitendra Bangar

Romance Inspirational Others

तू अन् मी

तू अन् मी

1 min
178


असंच राहू दे ना आपलं नातं

त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊ या;

आहोत ना एकमेकांसाठी खास

मग एकमेकांना घाव नको देऊया!


द्यायचंच असेल तर देऊ ओठांवर हसू,

कधी उदास असू, तर खुदकन हसता येईल


हृदयामध्ये थोडी अशी जागा -

जीवनाच्या वाटेवर दमलो कधी,

तुझ्या सोबतीने बसता येईल

पण ज्या छळतील आपल्याला अशा

आठवणींचा गाव नको देऊ या,


असंच राहू दे ना आपलं नातं ,

त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊ या!!


प्रेमात नेहमी दुःखच असते

मग कश्याला त्या दुखाच्या वाट्याला जाऊ या

प्रेम आहे न दोघात हे

आपल्या नजरेला कळू दे ना


असंच राहू दे ना आपलं नातं

त्याला उगाच प्रेमाचं नाव नको देऊ या!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance