STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Romance Action Inspirational

3  

Sagar Jitendra Bangar

Romance Action Inspirational

वाढदिवस

वाढदिवस

1 min
171

प्रवास सुरु असतो, नकळत वेगळे वळण घेऊ लागतो, त्या वळणावर कधी आपले माणसे मिळतात तर कधी आपलेसे करून घेणारे माणसे मिळतात. असेच आपल्या सगळ्यांचे लाडके तसेच ग्रुप मधील एक शांत व्यक्तिमत्त्व......

           चेहरा जसा शांत, तसेच हजरजबाबीपणा, वक्तशीरपणा आणि परिपूर्ण असे रुबाबदार व्यक्ती माननीय श्री प्रशांत सर......

                    खर तर ग्रुप ला नवे स्थान मिळवून देणारे, कविते सोबतच नवनवीन कल्पना घेऊन आपल्या समोर येणारे प्रशांत सर यांचा आज जन्मदिवस....


            खर तर शुभेच्छा लेट होत आहेत...पण मुद्दाम उशिरा द्याव्या वाटताय... कारण दिवसभरात अनेक फोन, अनेक मॅसेज ने शुभेच्छा मिळाल्या असतील. पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा माणूस विसरत नाही. म्हणून हा सगळा खटाटोप.....

             आम्ही पहिली तर नाही परंतु शेवटची साथ नक्की बनू शकतो म्हणून उशिरा शुभेच्छा देतो आहोत.....

आपण असेच दिर्घयुषी, होवो आणि दिवसागणिक आम्हाला आपल्या कवितांचा आणि नवनवीन कल्पनांचा सहवास लाभो हीच एक आशा....


" आपणास जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा"


आपल्याला एक छोटीशी भेट......


" शांत आहे व्यक्तीमत्व

तसेच बोलण्यात एक लकब आहे

वक्तशीरपणा तर झळकतोच

पण चेहऱ्यावरही मंद स्मित आहे

असे आमचे प्रशांत सर,

या समूहाची शान आहे.....

वाढदिवस तर निमित्त

पण आपण नेहमी हसत राहावे

आपल्या कवितांचे वार

आम्ही ही झेलत राहावे

कधी शब्द तर कधी कवितांचा आधार घेतो

आणि आम्ही आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो....."


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance