एक पान आयुष्याचं
एक पान आयुष्याचं
एक पान आयुष्याचं
माझ्यासाठी ठेवायचं ।
पानावर तिचे नाव
फक्त आहे लिहायचं ।।
कधी कधी मज वाटे
घ्यावे बोलून एकदा ।
राहायचे तुझ्यासवे
म्हणूनीया प्रिये सदा ।।
तिच्यावर प्रेम माझे
तिचे नव्हे माझ्यावर ।
याचे मज नित्यदिनी
दुःख होते अनावर ।।
गरिबाच्या घरी जन्म
झाला माझा गुन्हा नाही ।
माझ्यासम प्रेमवेडा
आता होणे पुन्हा नाही ।।
नाव तिचे लिहिलेले
पान ठेवतो जपून ।
तिच्या आठवणीमध्ये
जरा पाहतो जगून ।।

