STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Romance

3  

Sagar Jitendra Bangar

Romance

हो मी प्रेम केलं

हो मी प्रेम केलं

1 min
242

तुझ्या स्मित हसण्यावर 

माझ्या पासून दूर होताना ओल्या झालेल्या तुझ्या पापणीवर 

तुझ्या बोलक्या डोळ्यांवर , त्यांच्यातील निरागसपणावर 

माझ्यावर रुसून बसलेल्या तुझ्या गालांवर 

रागाने लाल झालेल्या तुझ्या नाकावर 

माझी स्वप्न बघणाऱ्या तुझ्या बंद डोळ्यांवर 


तुझ्या भाबडेपणावर 

अबोल राहणाऱ्या तुझ्या ओठांवर 

वाऱ्या च्या तालावर नाचणाऱ्या तुझ्या केसांवर 

माझे अश्रू पुसणाऱ्या तुझया हातांवर 

आधार देणाऱ्या तुझ्या खांद्यावर 


धीर देणाऱ्या शब्दहांवर 

माझी प्रत्येक पावलावर साथ देणाऱ्या तुझ्या पाऊलांवर 

माझी प्रत्येक चूक माफ करणाऱ्या तुझ्या हृदयावर 

मला समजणाऱ्या तुझ्या मनावर 


माझ्या साठी गर्वाने उंच होणाऱ्या तुझ्या मानेवर 

माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तुझ्यावर 

मनापासून माझ्या मनाने तुझ्या मनावर प्रेम केलय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance