तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी
छळती मनाला
स्वप्नी तुझे येणे
जय हर्ष मला
दुरावा तुझा हा
मला सहावेना
तुझ्या विना आता
मला राहवेना
गालात हसणे
रुसून बसणे
नजरेचे तीर
माझे भारावणे
हातात तो हात
लाजून पाहणे
आकर्षिते मज
लाडिक बोलणे
एकांताची भेट
आठवते मजला
भेटण्या तूजला
सजना ग सजला