STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

वीज गेली

वीज गेली

1 min
205

देहात आज माझ्या खेळून वीज गेली

 होकार तू दिल्याने नाचून वीज गेली


 एका क्षणात झाला वर्षाव चांदण्यांचा 

आकाश भावनांचे उजळून वीज गेली 


गेला कुठे उन्हाळा दारात पावसाळा 

आला ऋतू फुलांचा सांगून वीज गेली 


थंडीत गार वारा अंगा सुटे शहारा

वेगात काळजाला भेदून वीज गेली 


एका मिठीत विझला वणवा युगायुगांचा

ओठास ओठ मिळता पेटून वीज गेली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance