STORYMIRROR

Surekha Chikhalkar

Romance

3  

Surekha Chikhalkar

Romance

येतील का पुन्हा भेटण्यास

येतील का पुन्हा भेटण्यास

1 min
163

तुम्ही नव्हता तेव्हा

सारेच कसे अबोल होते

एकमेकांत गुंतलेले क्षण

सारे हरवले होते ..


चार भिंतीत होते

आयुष्य फक्त आठवणीचे

चार भिंतीपलीकडे 

नव्हते क्षण भेटण्याचे ..


होतो शाळेत तेव्हा

ऋतू बहुरंगी असायचे बहरलेले

उन्हाळे पावसाळे आता

असतात संसारामधे गुरफटलेले...


होतो एकत्र तेव्हा

कुरकुर, भांडण कसले नाही

विसरून सारी टेंशन

निर्धास्त जगलो आपणही...


शाळेशिवाय सवय ती

कसली नव्हती

तुमच्या अवती भवती अस्तित्व

ना कसली भीती...


जवळी नव्हता तेव्हा

कळली मैत्रीची परिभाषा

भेटू पुन्हा नव्याने घेऊन

उमेद ,एक नवी दिशा ...


भेटण्या येणार जेव्हा तुम्ही

येईल अर्थं पुन्हा जगण्याला,

नसेल आता मैत्रीशिवाय

प्रवास आपला थांबलेला...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance