दुःख मनातले
दुःख मनातले

1 min

405
कुणा सांगावे कसे सांगावे दुःख मनातले
कोण घेईल समजून आता दुःख मनातले
राहते सतवत मलाच का हे दुःख मनातले
करू मी आता सहन कुठवर दुःख मनातले
जगासाठी मी राहिलो आजतागायत हसत
अन् हसत हसत लपवले मी दुःख मनातले
छळले मला कितीदा माझ्याच माणसांनी
पण बोललो ना कधी त्यांस दुःख मनातले
वाटे जेव्हा कधी मज जगणे नकोनकोसे
मग आपलेसे वाटे मज दुःख मनातले
"सागर,, नको करू रे काळजी तू जीवाची
एकदिनी सरेल सारे तुझेही दुःख मनातले