STORYMIRROR

Namarata Pawaskar

Abstract Fantasy

4  

Namarata Pawaskar

Abstract Fantasy

एकटेपणाचं भूत ( कविता)

एकटेपणाचं भूत ( कविता)

1 min
477

एकटेपणाचं भूत आता मानगुटीवर नाही बसत...

शेजारी-शेजारी बसून तो आणि मी... गप्पा मारतो आताशा...

बाहेरच्या गारव्यात उभारून... या गर्दीत हरवल्या शहराला पाहतो...

मी शांत तो विस्मित... म्हणे या गर्दीत... माणसं राहतात कशी?...

म्हटलं जसा तू!... मला धरुन राहतोस... अगं, पण हा कोलाहल!...

माणसाला वेढून टाकतो... तूही तसाच की... मला वेढून टाकतोस...

वेगळीच दिसते मी, जाईन तिथं... गर्दीतही माणसं...

माझ्यापर्यंत पोचत नाहीत... ही सगळी किमया... तुझीच तर आहे...

माझं सोड गं!... पण, आज तो का नाही सोबत?... तुझ्यापासून मला वेगळं करायला धडपडणारा...

अरे! त्यालाही त्याचं आयुष्य आहे... मी थोडीच त्याच्या जगण्याचा भाग आहे... भारीच आहेस तू!... काल एक होतो म्हणताना... आज असं वेगळं केलंस स्वतःला?...

ए, तू चोरून गप्पा ऐकतोस आमच्या?... छे! गप्पा कसल्या?... तुला रोज त्याची समजूत काढताना पाहतो... कसं जमतं तुला?... त्याच्यात विरघळताना... स्वतःला बाजूला काढायला?...

पाणी आहे रे मी!... ज्याक्षणी जो जवळ असेल... त्याच्यासारखं जगावं लागतं... तो जवळ असला की त्याच्यासारखं... नी तू जवळ असलास की तुझ्यासारखं... मी कुणाचीच नाही... ना त्याची ना तुझी... खरंतर मलाही माहित नाही... इथं कुणी माझं आहे की नाही ते!...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract