Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Namarata Kudalkar

Others

2  

Namarata Kudalkar

Others

एकटेपणाच्या भूताचा कंटाळा

एकटेपणाच्या भूताचा कंटाळा

2 mins
330


एकटेपणाचं भूत आता कंटाळून गेलंय...

माझ्यासोबत रहायचं त्याच्या जीवावरती आलंय...

Need some change सारखं सारखं म्हणतं...

रात्री अपरात्री झोपेत दुःस्वप्नांनी कण्हत...

भिती आहे त्याला वाटतं माझी सवय होईल...

एकटेपणाचं भूत आपण, तिच्याशिवाय कसं होईल...

मी हसले की ते रडतं, पटकन् माझ्या पाया पडतं...

सोड मला जाऊ दे, थोडसं एकटं राहू दे...

जुळल्या आपल्या सवयी आता थोडसं वेगळं जगू दे...

कंटाळलो मी तुला मला दुसरं झाड धरू दे...

कुणीतरी हळवं होईल, त्याला-तिला कुशीत घेईल...

सोबत आहे आपली म्हणत मला तिथून घालवून देईल...

मोकाट मी भटकत राहीन, गर्दीमध्ये मिसळून जाईन...

भरी महफ़िल की तनहाई कुणातरी भेट देईन...

तुझा झालाय काळा कातळ, आतल्या भावनांचा घट्ट साकळ...

पहिल्यासारख्या भावना तुझ्या आता ऊतू जात नाहीत...

मलासुद्धा तुझ्या भेटीचे कढ वरचेवर येत नाही...

बरं वाटायचं जेव्हा तू आठवणीत हरवायचीस...

नको मला हा एकटेपणा म्हणत खूप पाणी गाळायचीस...

गाळायचीस की गिळायचीस तेव्हा काहीच कळलं नाही...

तू दुःखी की आनंदी? या गणिताचं उत्तर अजून जुळलं नाही...

कित्ती वर्ष झाली आपण सोबती एकमेकाचे...

मी तुला वळलो पण तू मला कळलीच नाहीस...

मौन सोड बाई मला खर सांग एकदा...

केला नाहीस ना तू कुणाशी कसलाही वादा!...

माझी सोबत तुला कुणी दिली नाही ना भेट! ...

नसेल तर दाखव मला तू बाहेरचं गेट...

तोंडभर पसरलं हसू अन् टपकले दोन आसू...

तुला नाहीतर कुणा मी सांग सोबत घेऊन बसू?...

घर माझं चार भिंती, माणसं राहतात अंतरावरती...

इथे राहतो आपण दोघे, बाकी सगळे निव्वळ बघे...

जायचं तर जा तू! फेरफटका मारून ये...

माझ्यासारखं आणखी कुणी भेटतं का बघून ये...

बदल नियम निसर्गाचा, जगण्याच्या सर्ग उपसर्गाचा...

हवं तेवढं भटकून घे, थोडं जगणं साठवून घे...

आलास तू की गप्पा मारू, पुन्हा लोकांना टार्गेट करू...

सोबत उभारून गच्चीमध्ये, चांदण्याला साथ करू...

भलं थोरलं पसरलं आभाळ, त्याच्या अंगी चांदणं गबाळ...

वारा मंद वाहत राहील, पाऊस गाणं म्हणून जाईल...

अवचित कधी तोही येईल, आपला तुपला होऊन जाईल...

पुन्हा मला जवळ घेईल, तुला कोपऱ्याची शिक्षा देईल...

कोरडा तू मी सळसळ पान, सलगीने त्याच्या तुझं तळमळ गान...

माहितेय मला तू टाळतोस त्याला...

विनाकारण पाण्यात तू पाहतोस त्याला...

माहीत नाही तुला पण, तोही आपला एक कोन...

माणसांमध्ये राहून सुद्धा, तोदेखील अलोन झोन...

तिघे आपण सोबत राहू, एकमेकांना समजून घेऊ...

कधी होईल आपली गट्टी, कधी तुझी त्याच्याशी बट्टी...



                  


Rate this content
Log in