STORYMIRROR

Namarata Pawaskar

Abstract Others

4  

Namarata Pawaskar

Abstract Others

माणसा हा भोग रोजचा

माणसा हा भोग रोजचा

1 min
469

रिकाम्या रिकाम्या वेळेत आता...

भावनांना भरायला हवं...

रागाला राग शिकवायला हवा...

मायेची छाया काढायला हवी...

रुसण्याशी नातं तोडलचं होतं...

त्याच्याशी पुन्हा जुळायला हवं...

दुःखाचा आवेग ओसरू द्यावा...

डोळ्यांतल्या पाण्याला ओघळ हवा...


चिंतेचा चटका भाजतो जिवा...

कुटिलाच्या आत काव्याचाही कावा...

साऱ्या भावनांचा झाला वेडाच बनाव...

घेऊ नका म्हणावं त्याला कुणीच मनावं...

चार भिंती दार खिडक्या...

साऱ्या रंगूनही सडक्या...

माझं धुपलेलं अंगण...


त्याला सुक्या बागेचं रिंगण...

कोजागिरीचं चांदणं...

आता कडूशातून येईल...

मग झळझळ उठेल...

सारी झिरमिर सुटेल...

तह वादे चिठोऱ्यांची...

बरकत मैत्रीच्या धंद्याला...

निळं झगमग आकाश...

तरी पाणी का भकास...


सांग कशाचा आकस?...

कुणी कुणावर धरावा...

त्याचा गुंतलेला वेळ...

माझा मोकळाच माळ...

गेली बाग रिंगणाच्या पार...

शब्दा कापण्याची धार...

काळजाचे धागे धागे...

वारा वारांनी मोकळे...

सल रुतून बसतो...

आत जपून नासतो...


ठूसठूस तळव्याला...

पाया भिंगऱ्या होतात...

भिंगऱ्यांचं वय काय?...

मागल्या स्टेशनात पाय...

भूतं मरत नाहीत...

माणसं कळत नाहीत...

जीव जीवा जवळचा...

माणसा भोग हा रोजचा...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract