STORYMIRROR

Namarata Pawaskar

Others

3  

Namarata Pawaskar

Others

शब्द

शब्द

1 min
232

शब्द चतुर असतात

शब्द वेडे असतात

शब्द वाकडे असतात

शब्द सरळ असतात

आडवळणावर भेटणारे;

शब्द थोडे खट्याळ असतात...

शब्द चुगली करतात

शब्द भांडणं लावतात

ओठाच्या कोपऱ्यातून हळूच येऊन वाटाघाटी तह करतात...

नको नको ते बोलवतात

नको नको ते ऐकवतात

हवं हवं ते गिळून टाकतात

डोळ्यांमधून वाहून जातात...

सांगा यांचं काय करायचं?

यांना आता कुठे ठेवायचं?

प्रेम करतात, रागवतात

रुसवे-फुगवे घालवतात...

मान-अभिमान जागवतात...

सन्मान-अपमान घडवतात...

भिती भय कारुण्य

बाल्य यौवन तारुण्य...

गृहस्थाश्रम वृध्दापकाळ

सारं काही यात येतं...

येता जाता छेडणारं प्रेमसुद्धा हेच करतात...

रसिकता न् शृंगाराची पावती

पण तेच देतात...

सांगा आता काय म्हणायचं?

यांना कुठं कमी लेखायचं?

जन्मानंतरचा सोहळा यात...

मृत्यूनंतरचा शोक यात...

अस्मिता भडकवणारी आग यांची...

विनाशानंतरची संवेदनशील

शांती यांची...

पेटवणारी ज्वाला...

विझवणारे पाणी...

आकाशाची व्याप्ती...

भूगर्भाची खोली...

वाहणारा वारा...

पंचभूतात यांचा पसारा...

शब्द वेचा शब्द ठेचा

शब्द ओचा शब्द काचा (काष्टा)

शब्द वस्त्र शब्द नग्न

शब्द शस्त्र शब्द भग्न

शब्द ध्यान शब्द मग्न

शब्द बाह्यातला शब्द अंतरातला

शब्द कोलाहल शब्द असीम शांतता



                


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை