STORYMIRROR

Namarata Pawaskar

Tragedy

3  

Namarata Pawaskar

Tragedy

जितंपणीच मेलेला मी

जितंपणीच मेलेला मी

1 min
232


नाहीच पडला पाऊस तर तिला काय कळतं?...

असं वाटणाऱ्या प्रत्येकासाठी ती फक्त निर्जिव माती असते...

ज्यांना कळलीचं नाही कधी मंदोदरीची वीण...

त्यांना कुठून येणार मातीच्या प्रसूतीची जाण?

अलवार पाण्याच्या आकाशसरींनी भुसभुसून रोमांचलेली ती...

कशी कणाकणानं कोंभत, पालवत, फुलत, फळत जाते ती...

आता त्याचा आटता झालाय झरा नी ढगांना नुसताच पळवत राहतो वारा...

फुलतो पिसारा पण ना बेभानतो कसा हा मोर...

नाच नाचून दमला तरी ना डोळ्यातून गळते धार...

आता लांडोर उपाशी, झाली दैवानं रिती तिची कुशी...

तहानेल्या चातकाचा असा उखडला वंश...

दळभद्री हा असला इथला वचनांचा कंस...

याच्या पोटात सगळं कशी ओकारी व्हईना?...

पाय भिजवण्यासुदीक टिपू(स) पाण्याचा मिळना...

आता झाडाशी टांगल्येला मी जित्तपणीचं मेलेला...

नाही नाही म्हणताना पुरा बकासुरानं खाल्येला...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy