STORYMIRROR

Namarata Pawaskar

Others

3  

Namarata Pawaskar

Others

तिच्या सोबती

तिच्या सोबती

1 min
357

ती सोबत असताना

भवताल बहरुन यावा...

क्षणांचे व्हावे फुलपाखरू

चहूबाजू भिरभिरत रहावे...

आकाशी व्हावी दाटी

काळ्या मेघांच्या दुलईची...

मृदगंधाचे उडावेत अत्तरसडे

उधळण मातीच्या सुरईची...

सर धावत धावत यावी

तिच्या अंगांगी बिलगावी...

विज कडकडावी हासून

देहात शिरशिरी शिलगावी...

पायवाट भिजे वळणांची

ओलेती बहरून यावी...

सळसळत्या वाऱ्यासंगे

केशी गुंतून रहावी...

गुंजे मेघांचा गर्जारव

सारे पडदे ओढून घ्यावे...

वायूस चढावा शीतज्वर

मी मिठीत मिटून जावे...

पन्हळीतून ओघळती थेंब

मी ओठांनी टिपून घेतो...

स्पर्शाच्या सुखद सहवासी

मी पावसात भिजून जातो...

ती झरझर झरझर झरते...

माझ्यात हळूच का विरते...

सुगंध सोनसळा का सरते?...

कशी मोरपिशी जादू फिरते...



Rate this content
Log in