जर भेटला असता मला जीनी .....
जर भेटला असता मला जीनी .....


अलदिनाच्या जमान्यात जीनी होता त्याचा साथी
भेटला तो त्याला जादूच्या दिव्या मधुनी
त्याच्या जादूने सहज होई काम फत्ते
तो मात्र अलादिना लाच दिसे
मनी आले माझ्या, जर भेटला असता मला जीनी
तर बदलून टाकली असते मी हि परिस्थिती
केले असते मी काम
पळवून लावले असते कोरोनाला मी लांब
कोरोना परत आत शिरायला घाबरेल
अशी केली असती मी व्यवस्था
कोरोना मुक्त झाला असता देश आपला
सध्या च्या परिस्थितीत जगण महाग झालाय
मरण मात्र स्वस्तात जातंय
भेटला असता जादूचा दिवा तर बरं झालं असतं
जीनी ने हुकूम मेरे आक्का म्हुणुन
सगळे काम फत्ते केले असते ....