ईश्वर
ईश्वर


मनास देई चेतना
आकार मिळे जीवना
आधार सा-या सृष्टिचा
त्या ईश्वराची आराधना।।
ध्यान त्याचे करिता
अहंकार जाई लयास
मीपणाचा होई अंत
सुखाचा होई जीवनप्रवास।।
सर्वव्यापी आस्तित्व त्याचे
जगाचा करी उद्धार
सांभाळ करी लेकरांचा
देई संसाराला आधार।।
जन्माचा तू सांगाती
करितो तुझी निस्सीम भक्ती
तुझ्या चरणी लीन होवो माथा
नसावी कोणतीच आसक्ती।।