STORYMIRROR

Sonam Thakur

Fantasy Others

4  

Sonam Thakur

Fantasy Others

फुलपाखरू

फुलपाखरू

1 min
23.7K

कधी वाटते मनास 

फुलपाखरू ते व्हावे

रंगबिरंगी तऱ्हे तऱ्हेच्या

फुलांवरती बागडावे


तृणावरील दव बिंदू 

प्राशन करूनि,

रंग बिरंगी रंग लेऊनी

कोवळ्या उनात नाहूनी

बेधुंद उडत राहावे


फुलपाखरास ना अडवी कुठली सीमा

न अडवे कुठले बंधन

फुलांमधले परागकण नेणे

हेच त्याचे जीवन


इवलेसे हे फुलपाखरू 

सांगती थोर मर्म

हसून खेळून आनंदाने

जागून घ्या रे हा जन्म


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy