चंद्र चांदणी
चंद्र चांदणी
खिडकीतून आज मी नभी डोकाविता,
मज पाहुनी चंद्र गाली गोड हसत आहे।
चंद्रास विचारलं मग मी, तू इतका खुश,
चांदण्यांना सोडूनी मज पाहुनी का हसत आहे।
चंद्र बोले गगनी चांदण्या मी रोज पाहात आहे,
धरतीवरची ही चांदणी आज मी पाहिली आहे।
चांदणी तू माझ्या मना खूप भावली आहे,
तुजसवे राहण्या मज धरतीवर यायचे आहे।