पाऊस आलाच नाही ....
पाऊस आलाच नाही ....
सायंकाळच्या वेळी
ढगाळ वातावरण पसरलेलं आकाशी
पक्षी निघाले होते थव्यासह आपुल्या घरी
ज्याला त्याला घाई घरी जाण्याची
पाऊसा आधी घरी पोहोचण्याची
मुले नाचू लागली येरे येरे पाऊसा म्हूणन
तयार सोडण्यास कागदी होडया घेऊन
सगळीकडे पाऊसमय वातावरण झालेलं
ते पाहून माझं मन नाचु लागलं
सुचल्या मला चार ओळी
लिहाव्या वाटल्या पाऊसावरती
अचानक झुळूक आली वाऱ्याची
आणि घेऊन गेला पावसाला आपल्यासोबती
सगळेच उत्सुक असलेला
पाऊस मात्र आलाच नाही