सम्या कलेक्टर
सम्या कलेक्टर
गावात
मटकी पाव इकणारा सम्या
कलेक्टर झाला
बातमी देशभर पसरली
दोन वाक्यात
सम्याने भाषण संपवलं
"जर सायबू तात्याने
त्या वेळी मला
शाळेत दाखील करून
पाटी पुस्तक घेऊन
दिलं नसतं
तर मी आज
येथे राहिलो नसतो"
कोण होता हा तात्या ?
पत्रकारांनी विचारपूस केली
नंतर कळालं
म्हशी चारणारा
मंदिरात नाही,
तर शाळेत दान
करायला सांगणारा
गावासाठी येडा ठरलेला
येडा सायबू होता