असे प्रेम बनो आमचे दोघांचे
असे प्रेम बनो आमचे दोघांचे


खऱ्या प्रेमाचा वनवा पुन्हा पेटू दे
जीव गुंतला जिच्यात, तिला भेटू दे
हाल बघेनासे झाले माझे प्रेमा रे
माझे इतके काळीज, तिचेही दाटू दे
तिच्यासाठी कधी माघार नाही माझा
माझीही थोडी काळजी, तिला वाटू दे
असे प्रेम बनो आमचे दोघांचे की
पाहून दगडाचाही कलेजा फाटू दे
उरले जे ही काही माझे आयुष्य हे
त्यातले सारे क्षण, तिच्यासंगे काटू दे