गावाकडची अवस्था
गावाकडची अवस्था
1 min
11.5K
आई कामावरून,
थकून थाकून आली
आईनं डोक्यावरचं,
बाळंतपणीच ओझं फेकलं
पुस्तक बाजूला करून,
आईला मी ग्लासमध्ये,
पाणी दिलं
पहिला घोट गळ्यात गेला नाही,
तोवर आईने विचारलं
"पाणी भरलं का?"
मी नाही म्हटलो
आई संतापली
बळतनीतलं लाकूड काढून,
मला हाणलं
मी रडत रडत,
जोऱ्यात आईवर ओरडलो
"म्हणजे मी अभ्यास पण,
करायचा नाय का?"
आईने घरात जाऊन
हंडा कळशी काढली,
माझ्यापाशी कळशी,
थांबवली
आणि म्हटली,
"एक वेळेस,
अभ्यास नाय केला तरी चालेल,
पण आधी पाणी भरायचं"